Skip to main content

Posts

Featured

मी होतो शिपाई !

        कॉलेजमध्ये खूप उत्साह ओसंडून वाहत होता. जिथे-तिथे मुलं-मुली आपापल्या घोळक्यांसोबत उभी होती . गप्पांना ऊत आला होता..आणि त्याला कारणही तसचं होतं ; उद्या 'विद्यार्थीदिन' होता!! त्यामुळे सगळे त्याविषयीच चर्चा करत होते..तर कोणी ती चर्चा ऐकून त्यांचीच टर उडवत होते.‌तसं प्रत्येक कॉलेजमध्ये असं एक 'टोळकं' असतंच!! सर्व मुली - शाल्मली,रेश्मा,श्वेता,पल्लवी आणि नेहमी आपल्या सौंदर्यावर भलताच अभिमान म्हणण्यापेक्षा गर्व असणाऱ्या प्रतिक्षा व वर्षा या सर्वही भलत्याच खुष होत्या. कॉलेजमध्ये ही 'जोडगोळी' विविध नावांनी फेमस होती - कोण त्यांना 'डबल बार' म्हणत तर कोण 'फटाकड्या'!! असो...तर यासर्वांमध्ये उद्या कोण कुठली नेलपॉलिश लावणार ते कोण, कोणत्या रंगाची साडी नेसणार ? ; कोण कोणती हेअर स्टाईल करणार?; कुठला परफ्यूम मारणार?, चप्पल की सैंडल?, पर्स की डिसेंट जीन्स शबनम ? इथंपर्यंत हजार प्रश्नांवर चिवचिवाट सुरु होता!!..... तर मुलांमध्येही अशाच ढंगाची पण पोरींची सर येईल इतकी तीव्र नसणारी, हलकीफुलकी तयारीविषयक चर्चा रंगली होती. अविनाश , प्रमोद , श्रवण, राहुल, अशोक, ...

Latest posts

सटवीचा लिखा !

डील्

चिक्कीवाला - एक असामान्य व्यक्तिमत्व

ऋण !

अभागी भाऊ बहीण